उत्तर अमेरिकेत राहून आपण मराठी संस्कृतीची जोपासना करतोच. पण जेव्हा जागतिक मराठी परिषदेच्या निमित्ताने आम्ही जगभरातले मराठी भाषक एकत्र भेटतो, तेव्हा इस्त्रायलचे नोहा मस्सील, मॉरिशसच्या मधुमती कुंजल, चिलीचे बांदेकर, इंडोनेशियाचे कांचन निजसुरे आणि इतर अनेक परदेशवासियांकडून त्या त्या देशात मराठी संस्कृतीच्या जोपासनेसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल ऐकतो, तेव्हा मन अभिमानाने भरून येते. २०१३च्या बॉस्टन येथील बृ. म. मंडळाच्या अधिवेशनात जगभरातील मराठीच्या पाईकांना आग्रहाने आणि सन्मानाने बोलावण्याचा मानस आहे.
'हा भारत माझा' हा चित्रपट ४ मे रोजी प्रदर्शित होतो आहे. अण्णा हजार्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एका कुटुंबाची कथा सांगणार्या या चित्रपटानं अनेक ज्येष्ठ समाजकारण्यांना भारावून टाकलं.
या चित्रपटाबद्दलचं डॉ. अभय बंग यांचं मनोगत...
गावात-देशात जन्मलेल्या आणि परदेशातही कौतुकाचे धनी झालेल्या 'लोटस' आणि 'शबरी' या खाकर्याच्या ब्रँडचे जनक म्हणजे मनीषा आणि कल्पेश दुगड हे मनस्वी जोडपं सांगत आहेत त्यांच्या व्यवसायाबद्दल, त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या तत्वं-निष्ठांबद्दल, त्यांच्या अनेक विषयांवरच्या मतांबद्दल आणि व्यावसायिकाने घरात बाहेर कसं वागावं- यासारख्या सहजसोप्या विषयांवरही!
लहानपणी शुभंकरोती म्हणताना आपण काही काही स्तोत्रे, श्लोक म्हणत असू. आपल्या ऋषी-मुनींनी तपसाधना करुन अनेक स्तोत्रे, स्तवने सिद्ध केली आहेत. त्यातील काही आपल्या नित्य पठणात असतात तर काही तात्कालीक कारणासाठी उपासना म्हणून म्हटली जातात.
मायबोलीचा आणि मायबोलीकरांचा साहित्याशी बराच जुना संबंध आहे. तो अजून दृढ कसा करता येईल, या विचारात असताना पुस्तकखुणा (bookmarks) तयार करण्याचे सुचले. या पुस्तकखुणांवर मायबोलीकर कवींच्या कविता असणंच उत्तम, असं वाटलं आणि मायबोलीकर कवींना याबद्दल विचारल्यावर त्यांनीही लगेच परवानगी दिली. त्यातून तयार झाला पुस्तकखुणांचा हा पहिला संच.
मायबोली.कॉमने प्रथमच आयोजीत केलेला 'हा भारत माझा'चा विशेष खेळ राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI) येथे काल रसिकांच्या 'हाउसफुल' प्रतिसादात यशस्वीपणे पार पडला. या प्रतिसादाबद्दल आणि सहकार्याबद्दल उपस्थीत सर्व रसिकांचे मन:पूर्वक आभार.हा एकंदर कार्यक्रम रसिकांना कसा वाटला, चित्रपट कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया वाचा
प्रदीप लोखंडे यांनी मोठ्या कष्टपूर्वक जमवलेल्या ग्रामीण भारताच्या डेटाबेसचा वापर करून प्रचंड मोठा व्यवसाय तर उभारलाच, पण या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी सतत दुर्लक्षित राहिलेल्या हजारो ग्रामीण तरुणांना रोजगारही मिळवून दिला. श्री. प्रदीप लोखंडे यांचा संपूर्ण जीवनप्रवास श्री. सुमेध वडावाला (रिसबूड) यांनी 'प्रदीप लोखंडे, पुणे-१३' या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे. या पुस्तकातील ही काही पानं...
मायबोली शीर्षकगीताचे प्रकाशन ही सर्व मायबोलीकरांसाठी व विशेषत: या गीताच्या निर्मितीशी संबंधित सर्वांसाठी अत्यंत आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. या उपक्रमाच्या सुरुवातीपासून सहभागी असणार्या सर्व मायबोलीकरांचे आणि त्यांच्या कुटूंबियांचे हार्दिक अभिनंदन. या शीर्षकगीताची जी छोटी झलक होती तिला जसा तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात तसेच या संपूर्ण गीतालाही तुम्ही आपलेसे कराल अशी आशा आहे.
मायबोलीवरील छोट्या जाहिराती काही काळासाठी बंद होत्या. तो विभाग आता पुन्हा सुरू झाला आहे.
या दुव्यावर तुम्हाला जाहिराती पहता येतील. http://jahirati.maayboli.com/